शेळीपालनाची ‘SIP’- ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबनाचा यशस्वी फॉर्मुला…”*



शेतीप्रधान भारतात आजही अनेक कुटुंबं आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत आहेत.
अशा परिस्थितीत ग्रामीण भागात स्वयंपूर्णतेचा आणि सशक्ततेचा नवा मंत्र म्हणून पुढे येत आहे-
*SIP- Sheli Investment Plan.*

शेळीपालन हा व्यवसाय केवळ जोडधंदा न राहता आता शाश्वत उत्पन्नाचं माध्यम बनतो आहे.
“गावातील SIP” ही संकल्पना शहरी SIP *(Systematic Investment Plan)* प्रमाणेच
नियमित उत्पन्नासाठी विश्वासार्ह मार्ग ठरत आहे



*काय आहे? SIP- Sheli Investment Plan?*

*Sheli Investment Plan (SIP)* ही शेळीपालनाच्या व्यवसायाची नियोजनबद्ध रचना आहे,
जिच्या माध्यमातून अगदी दोन शेळ्यांपासूनही दरवर्षी हजारो रुपयांचं उत्पन्न मिळवता येतं.

या प्लॅनअंतर्गत योग्य जातींची निवड, आहार व्यवस्थापन, आरोग्य काळजी व गोठा निर्मिती,
प्रजनन नियंत्रण, मार्केटिंग आणि विक्री पर्यंत संपूर्ण साखळी उभी केली जाते.

*ग्रामीण गरजांशी सुसंगत SIP*
-शेतीवर अवलंबून असलेली अस्थिर अर्थव्यवस्था, महिला आणि युवकांमध्ये बेरोजगारी, स्थलांतर वाढलेलं असणं, शेतीसाठी सेंद्रिय खताची गरज, या सर्व समस्यांवर SIP हा प्रभावी आणि कमी गुंतवणुकीचा उपाय ठरत आहे.

*SIP चे फायदे*
कमी जागेत आणि मर्यादित संसाधनांमध्ये सुरू करता येणारा व्यवसाय.
-दरवर्षी शेळ्यांची वाढ- उत्पन्नात झपाट्याने वाढ.
-महिला सक्षम होतात- घरातूनच व्यवसाय.
-नैसर्गिक खत उपलब्ध- सेंद्रिय शेतीला हातभार.
-दूध, मांस आणि खत विक्री- त्रिकुट उत्पन्न.
-सरकारी योजना आणि प्रशिक्षण उपलब्ध.
-स्थानिक व शहरी बाजारपेठेतील विक्रीची मोठी संधी.

*तीन टप्प्यांत SIP- एक यशस्वी मॉडेल*

*S- Sheli* देशी आणि व्यापारी जाती निवडून शेळ्यांची वाढ.
*I- Investment* वेळ, समर्पण आणि थोडी आर्थिक गुंतवणूक.
*P- Plan* नियोजनबद्ध व्यवस्थापन- आरोग्य, पोषण, उत्पादन व विक्री.

*दिवसेंदिवस शेळीपालन बाबत ग्रामीण यशोगाथा वाढत आहेत*
माझ्या पशु व्यवस्थापन सल्लागार म्हणून अनुभवात अनेक उदाहरणं पाहिली आहेत-
जिथं दोन शेळ्यांनी सुरुवात करून आज कुटुंबं दरमहा 30-40 हजारांचे उत्पन्न मिळवत आहेत.
महिला बचत गट, शेतकरी गट, युवा मंडळं SIP च्या माध्यमातून नवे भविष्य घडवत आहेत.

*शेवटचा मुद्दा- ‘शेळी’ म्हणजे संपत्ती*
आज ग्रामीण SIP फक्त शेळीपालन नाही,
तर “Systematic Income Plan” बनलं आहे –
जे आत्मनिर्भरतेकडे, समृद्धीकडे आणि अभिमानाकडे नेणारं साधन आहे.

गावात SIP म्हणजे शेळी इन्व्हेस्टमेंट प्लॅन
आणि तीच तुमचं भविष्य घडवते, संपत्ती उभी करते!

*लेखक:*
*श्री. नितीन रामहरी पिसाळ*
*पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विशेषज्ञ*
*कृषी जर्नलिस्ट- सतनाम भारत न्यूज*
*मो.बा- 8007313597*

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *